Khabar DinbharKhabar DinbharKhabar Dinbhar
  • Home
Khabar DinbharKhabar Dinbhar
Search
Follow US
  • Contact
  • Blog
  • Complaint
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.

12 minutes 46 seconds अन् 9 minutes 44 seconds MMS Original Link नेमकी आहे तरी काय? ओपन करताच सुरू होतोय सगळा खेळ..

Cyber Security Tips : सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळजनक MMS व्हिडिओची भीती पसरली आहे. या वेळी “12 minutes 46 seconds” आणि “9 minutes 44 seconds” अशी अचूक नावे देऊन लोकांची उत्सुकता वाढवली जात आहे. इंस्टाग्रामवर स्टोरीज, पोस्ट्स आणि कमेंट्समध्ये हे दावे जोरात फिरत आहेत. पण सावध व्हा कारण हे पूर्णपणे एक सायबर फ्रॉड आहे.

कसे काम करतात हे स्कॅमर?


काही खाती स्क्रीनशॉट शेअर करतात, ज्यात असा दावा असतो की एखाद्या महिलेचा खाजगी व्हिडिओ लीक झाला आहे. “फक्त एक विशिष्ट शब्द कमेंट करा किंवा DM पाठवा, मूळ लिंक पाठवतो” असं आमिष दाखवतात. लोकांची उत्सुकता इतकी वाढते की ते विचार न करता प्रतिसाद देतात. मग त्यांना एक लिंक मिळते… पण तिथे व्हिडिओ नाही, उलट धोकादायक वेबसाइट उघडते

या लिंकवर क्लिक केल्यावर काय होते?

  • वय पडताळणीची मागणी
  • संशयास्पद अ‍ॅप डाउनलोड करायला सांगणे
  • ब्राउझरला अतिरिक्त परवानग्या देण्याची विनंती
  • फोनमध्ये मालवेअर किंवा व्हायरस घुसवला जाण्याचा धोका
  • तुमचा डेटा, पासवर्ड किंवा बँक माहिती चोरी होऊ शकते

हे काही नवीन नाहीये.. यापूर्वी “7 minutes 11 seconds“, “19 minutes 34 seconds” अशा नावांनीही असेच फ्रॉड झालेत. तज्ज्ञ सांगतात, ही नेमकी सेकंदांपर्यंतची वेळ सांगण्यामागे एकच हेतू असतो लोकांना ते खरे वाटावे. पण तथ्य तपासणीत सिद्ध झाले की असा कोणताही खरा व्हिडिओ अस्तित्वातच नाही. हे सर्व जुने क्लिप्स, व्हिडिओ किंवा बनावट कंटेंट वापरून नवीन नाव देऊन पुन्हा पसरवले जात आहे.

लोक का फसतात?


व्हायरल ट्रेंड पाहून “सगळे बोलतायत तर खरंच असेल” असं वाटतं. “लीक व्हिडिओ” हे शब्द उत्सुकता वाढवतात. पण हीच उत्सुकता सायबर गुन्हेगारांसाठी मोठी संधी ठरते.

सुरक्षित राहण्यासाठी काय करावे?

  • अनोळखी अकाउंट्सच्या लिंक्सवर कधीही क्लिक करू नका
  • खाजगी व्हिडिओची लिंक अशा पद्धतीने मिळत नाही हे लक्षात ठेवा
  • संशय आला तर ब्लॉक करा आणि रिपोर्ट करा
  • थोडीशी सावधगिरी तुमचा फोन, डेटा आणि पैसा वाचवू शकते
Previous Article Vasectomy vs Tubectomy: Key Differences, Benefits, and Risks Explained
Next Article What is NAAC Accreditation What Is NAAC Accreditation? A Complete Guide for Students (2026)

Latest

theme of independence day 2026
Independence Day 2026 Theme: Everything You Need to Know About India’s 80th Independence Day
Blog
Placenta Meaning in Hindi
Placenta Meaning in Hindi
Blog
Love quotes in Marathi
100+Best Love Quotes In Marathi 2026 | तुमच्या प्रेमासाठी मराठी कोट्स
Blog
how to increase breast milk naturally
How to Increase Breast Milk Naturally: Safe & Effective Ways for New Mothers
Blog

KhabarDinbhar.in

Quick Link

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
© 2026 Khabar Dinbhar
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?